Induction of new members

Meeting Details

Meeting Date 18 Aug 2022
Meeting Time 19:00:00
Location Modak Sabhagruha F C Road
Meeting Type Regular
Meeting Topic Induction of new members
Meeting Agenda RCPM will induct new members.
Chief Guest
Club Members Present 25
Minutes of Meeting RCPM परिवारामध्ये मध्ये नवीन सदस्य सामावून घेण्याचा सोहळा अतिशय हृद्य असतो. १८ ऑगस्ट रोजी झालेल्या साप्ताहिक सभेत, आमच्या परिवारात दोन नवीन सदस्य सामील झाले.... खरं सांगायचं तर चार...कारण क्लब मध्ये इतकं कौटुंबिक वातावरण असल्यामुळे रोटेरियनचे बेटर हाफ सुद्धा कुठल्याही कार्यक्रमात तितक्याच उत्साहाने सामील होतात.? यातली एक तर घरवापसी (?) होती. आमच्या अल्ताफ आणि शुभदा चिकोडी याना काही वैयक्तिक कारणांमुळे थोडी वर्षं क्लबपासून दूर राहावं लागलं होतं. त्यातून उसंत मिळाल्यामिळाल्या त्यांनी परत मेम्बर व्हायचं ठरवलं. आणि दुसरे नवीन सदस्य दत्तात्रय आणि ( माधुरी )पंचवाघ!!! ह्या induction शिवाय आणखी एक सेलिब्रेशन होतं. रोटरीने जुन्या आणि ऍक्टिव्ह मेंबर्सचं कौतुक करायची एक अतिशय उत्तम कल्पना आणली आहे. त्यानुसार तुमचं वय आणि रोटरीमधली तुमची ऍक्टिव्ह वर्षं जर १००+पेक्षा जास्त असतील तर तुम्हाला सर(SAR100+- सिनियर ऍक्टिव्ह रोटेरीयन) म्हणून recognize करण्यात येतं. आमच्याकडे अविनाश जोशी, ( popularly known as AV ) त्या पदवीला सर्वार्थाने सार्थ करणारे!? त्यांनी रोटरीमध्ये कसं ऍक्टिव्ह राहावं याचा जणू वस्तुपाठच सर्वांसमोर ठेवला आहे.(अर्थात हे रेकग्निशन मिळवण्यात अश्विनीताईंचा तेवढाच सहभाग आहे!) १८ ऑगस्टच्या मीटिंगमध्ये ह्या सर्व सोहोळयाला साजेसा, अतिशय देखणा कार्यक्रम, त्या महिन्याच्या आश्लेषा मेट्रोस्टार्स नी आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी District Membership Director पंकज पटेल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह्या सर्व नवीन, जुन्या नवीन आणि उत्साही सदस्यांचे क्लबमध्ये मनःपूर्वक स्वागत???