Presentation on service projects by our club

Meeting Details

Meeting Date 25 Aug 2022
Meeting Time 19:00:00
Location Virtual meeting on Zoom
Meeting Type Regular
Meeting Topic Presentation on service projects by our club
Meeting Agenda RCPM service projects ongoing as well as completed will be presented
Chief Guest convenors
Club Members Present 25
Minutes of Meeting २५ ऑगस्ट ला क्लबच्या "प्रकल्पा ची माहिती सांगणारी " विषेश मीटिंग झूम प्लॅटफॉर्म वर आयोजित केली होती . झूम वर मीटिंग असल्या मुळे परदेशात असलेले सभासद पण उपस्थित होते. तसेच आपल्या प्रकल्पात पार्टनर असणारे इतर रोटरी क्लबचे सदस्य सहभागी झाले होते . प्रथम प्रेसिडेंट विवेक ने त्याच्या खास शैलीत झालेल्या मागील आठवड्यात झालेल्या प्रोजेक्ट व मीटिंग चा आढावा घेतला . ते एक उत्तम सादरीकरण होते . त्या नंतर प्रोजेक्ट डायरेक्टर पी पी मकरंद याने सूत्रे हाती घेऊन तीन मोठ्या प्रकल्पांची संपूर्ण माहिती क्लब सभासदांना देण्यासाठी प्रकल्प समन्वयक यांना विनंती केली. प्रथम रो प्रज्ञा , पी पी मुकुंद, पी पी पद्मा यांनी रामकृष्ण मिशन यांच्या सहकार्याने करीत असणाऱ्या "carriculam of joy "या प्रकल्पा ची पूर्ण भूमिका, नियोजन व अपेक्षा स्पष्ट केल्या. हा शिक्षण क्षेत्रातील उत्तम व उपयुक्त असा प्रकल्प , की ज्याची समाजात खरंच खुप गरज आहे व तो आपण करीत आहोत . जास्तीत जास्त सभासदांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्या नंतर रो सुनील यांनी २०१६ पासून ज्या विभागात आपला क्लब काम करतो आहे व आता ग्लोबल ग्रँट च्या सहकार्याने " Phalode cluster watershed and Integrated Development" ( २०२१ - २४) काम करणार आहेत, या प्रकल्पाची सविस्तर व उतम फोटो सहित PPT सादर केली. तसेच तेथील महिलांन साठी शिवणकला क्लास सुरू केला आहे . त्याचे पुढील नियोजन रो कविता हिने सांगितले. अतिशय उत्तम असे हे काम चालू आसून सभासदांनी त्यांच्या रुची व वेळेनुसार यात सहभागी व्हावे असे आवाहन पी पी मकरंद याने मीटिंग मध्ये केले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्वांगिण विकासा च्या या प्रकल्पात काम करणे नक्कीच समाधानाचे आहे. त्यानंतर या वर्षी आयोजित केलेल्या "अनुबंध" या पकल्पाची सविस्तर माहिती प्रकल्प समन्वयक पी पी नीलकंठ याने सादर केली. हा प्रकल्प आपण का करीत आहोत व कॅन्सर पेशंट ना कश्या प्रकारे मदत करणाऱ आहोत. त्याचा आराखडा सांगून सर्व क्लब सभासदांना त्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रकल्पांची माहिती सादर करणारी अशी मीटिंग ही स्तुत्य कल्पना सर्वांना आवडली. प्रत्येक क्वार्टर का अशी एक मीटिंग प्रेसिडेंट विवेक ने या तिन्ही प्रकल्पांचे PPT व मीटिंग चे रेकॉर्डिंग आपल्या broadcast ग्रुप वर दिले आहे. ते जरूर बघावे .