Kajara Mohabbatwala . Classic evergreen female duets by soorakshi group

Meeting Details

Meeting Date 16 Oct 2022
Meeting Time 17:00:00
Location ICMAI Auditorium
Meeting Type Regular
Meeting Topic Kajara Mohabbatwala . Classic evergreen female duets by soorakshi group
Meeting Agenda Melodious evening
Chief Guest
Club Members Present 40
Minutes of Meeting दीपावली २०२२ रांगोळ्या आणि पणत्यांनी सजलेली , रेशमी -जरी वस्त्रांनी नटलेली , सूर आणि संगीतानी भारलेली आणि सुग्रास जेवणाची तृप्तीची कळस चढवणारी " मेट्रो दिवाळी २०२२ " रविवार दिनांक १८ ऑक्टोबर रोजी ICMAI च्या सभागृहात संपन्न झाली . जुन्या काळातील आशयघन आणि कर्णमधुर अश्या ' स्त्री - द्वंद्व गीतांचा ' ' कजरा महोब्बतवाला ' हा बहारदार कार्यक्रम ' सूर-सखी ' ह्या समूहाने सादर केला . 'बचपन के दिन भी क्या दिन थे' ... अश्या बालपणीच्या आठवणी छेडून 'मैं चली मैं चली' म्हणत म्हणत सगळे ह्या अनोख्या सफरीवर निघाले आणि गुलाबी आठवणींच्या रेशीम लडी मनामनात उलगडत गेल्या . बालपणीच्या आठवणी जागवत , मैत्रिणींच्या घोळक्यात रमतगमत एका टप्प्यावर कबुलीही दिली 'अखियाँभूल गयी है सोना' .... एकमेकाच्या सहवासाचा आनंद उपभोगत असताना काळजी , अभिमान, प्रेम , जबाबदा-या वाटून घेताना अवघ्या आयुष्याचा उत्सव करत ' बेला महका रे महका ' अशी तरल अनुभूती दिली . ' जानू जानू रे ' म्हणत अवखळ चेष्टा मस्करीतून उत्कृष्ट वातावरण निर्मीती करत मैफिलीनी आनंदाचं एक अत्युच्च शिखर गाठलं . सगळ्या सूर - सख्यांनी डोक्यावर पिस लावलेली टोपी ठेवली आणि टाळ्यांच्या ठेक्यावर , कव्वालीच्या नखरेल बोलावर मैफिल अक्षरशः डोलू लागली . आपल्या उत्साही मेट्रो सदस्यांनी तर ठुमके लावत माहोल तयार केला . उत्कृष्ट, तरल , खुसखुशीत निवेदन आणि प्रसन्न वदना सूर सख्या ह्या आणखी दोन जमेच्या बाजू ह्या मैफिलीत अनुभवायला मिळाल्या . मैफिलीचा औपचारिक समारोप झाल्यावर ही मेट्रो परिवाराच्या आग्रहाखातर पुन्हा एकदा वाद्य जुळवली गेली आणि ' हसता हुआ नुरानी चहेरा ' म्हणत सगळे हसतमुखाने बाहेर पडले . मसालेभात , अळूची भाजी अश्या स्वादिष्ट जेवणाची लज्जत चाखून सर्व मेट्रो परिवार तृप्त झाला . उत्कृष्ट कार्यक्रम, लज्जतदार जेवण आणि वेळेचं सुयोग्य नियोजन ह्या त्रयीवर ही दिवाळी फारच आनंदाची झाली