2 Min Jalwa. District 3131 competition with 21 teams from district participating

Meeting Details

Meeting Date 20 Nov 2022
Meeting Time 04:00:00
Location Bhave Prathmik school hall, sadashi peth
Meeting Type Regular
Meeting Topic 2 Min Jalwa. District 3131 competition with 21 teams from district participating
Meeting Agenda Meeting called to order, Welcome Competition Manogat by President, Judges, convenor, Chief guest Results Announcements, Vote of Thanks
Chief Guest Mr Ravindra Khare
Club Members Present 0
Minutes of Meeting रोटरी क्लब पुणेमेट्रो तर्फे "टूमिनिट्स जलवा" दोन मिनिटांचेनाट्यमय सादरीकरण 20 नोव्हेंबरला झाले. 2020 साली ही स्पर्धारोटरी क्लब बाहेरच्या नाट्यप्रेमी समूहासाठी आणि शाळेतल्या मुलांसाठी खुली करण्यात आली होती. तोच पायंडा चालूठेवून 2022 मध्ये ही स्पर्धाआयोजित करण्याचेनक्की झाले. स्पर्धेसाठी प्रवेशिका मिळवण्यासाठी डिस्ट्रिक्ट 3131 च्या कल्चरल कमिटी मार्फतही बराच प्रचार करण्यात आला. 13 मोठ्या लोकांच्या नाटीकां आणि पाच मुलां च्या नाट्यछटा सादर होणार होत्या. परीक्षक होतेडॉक्टर अजय जोशी, चारुलता पाटणकर, आणि क्षितिजा आगाशे. तसेच रवींद्र खरे भरत नाट्यमंदिरचेविश्वस्त प्रमुख पाहुणे होते. ही सर्वमंडळी नाट्य क्षेत्रात खूप नवाजलेली आहेत आणि सध्या पण ऍक्टिव्ह आहेत. स्पर्धेला सुरुवात झाली बाल कलाकारांच्या नाट्यछटांनी. पोल्युशन, पर्यावरण, वगैरेविषय हाताळत या मंडळींनी दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर मोठ्या कलाकारांचेजवळजवळ 13 प्रवेश झाले. त्यात सध्याचे सामाजिक विषय तर होतेच त्याशिवाय गृहकलह, घरातला संवाद किंवा विसंवाद, समज गैरसमज, असेनेहमीचेपण होते. स्पर्धाअतिशय चुरशीची झाली. मध्यंतरानंतर बक्षीस समारंभ झाला. सुरुवातीला निमंत्रक मुकुंद चिपळूणकर व अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी या स्पर्धेमागची कल्पना आणि आशयाचा विचार विशद केला. त्यानंतर परीक्षकांची ओळख, त्यांचा सन्मान आणि त्या सर्वांतर्फेपरीक्षकांचेमनोगत क्षितिजा आगाशेयांनी व्यक्त केले. त्यांनी बरेच चांगलेमुद्देस्पर्धकांच्या हितासाठी आणि मार्गदर्शनासाठी छान सांगितले, ज्याचा पुढील वर्षी चांगलेसादरीकरण करण्यात सर्वांना खूप उपयोग होईल. नंतर प्रमुख पाहुणेश्री रवींद्र खरेयांची ओळख, सन्मान आणि त्यांचेमनोगत असा कार्यक्रम झाला. श्री रवींद्र खरे यांनी आवर्जून लोकांना आवाहन केलेकी लग्न समारंभात किंवा कुठल्याही कौटुंबिक मंगल प्रसंगी सध्याची जी ट्रेंड आहे की नृत्याचा कार्यक्रम करावा, त्याऐवजी त्यानी नाटक किंवा नाट्यमय सादरीकरण करण्यास प्रोत्साहन दिलेपाहिजे. त्यामुळेसमाजाच्या जडणघडणीत आणि विशेषतः तरुणाईच्या जाणिवांमध्येखूप फरक पडेल, असेनमूद केले. त्यानंतर क्षण आला स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याचा. रोटरी क्लब पुणेमेट्रोच्या नेहमीच्या हातखंड्याप्रमाणेस्पर्धाआणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.