14-09-2017 - 14-09-2017

रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या तर्फे  'अशा शाळा असे शिक्षक' कार्यक्रम संपन्न  नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असलेल्या पाच शाळांचा  केला सत्कार  पुणे, १४ सप्टेंबर २०१७: रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो यांच्या तर्फे शिक्षक दिनाच्या निमित्ताने 'अशा शाळा असे शिक्षक' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. काही शाळा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असतात अशा शाळेतील शिक्षकांशी संवाद साधणे आणि त्यांच्या या उपक्रमांची माहीती अन्य शाळेतील शिक्षकांपर्यंत पोहोचावी याच उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित असलेल्या पाच शाळांची निवड या कार्यक्रमात करण्यात आली होती. या शाळेतील शिक्षकांशी यावेळी मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधण्यात आला. यावेळी शिक्षणतज्ज्ञ डॅा़़ अ.ल. देशमुख आणि रविंद्र येवले यांनी मुलाखत घेऊन शिक्षकांशी संवाद साधला. प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शाळेत राबवित असलेल्या अनेक नवनवीन उपक्रमांची माहिती यावेळी शिक्षकांनी दिली.

Project Details

Start Date 14-09-2017
End Date 14-09-2017
Project Cost 52000
Rotary Volunteer Hours 150
No of direct Beneficiaries 300
Partner Clubs
Non Rotary Partners
Project Category Basic education and literacy, District Thrust Area