Experience Awadh

Meeting Details

Meeting Date 17 Nov 2022
Meeting Time 18:30:00
Location ICMAI Hall
Meeting Type Regular
Meeting Topic Experience Awadh
Meeting Agenda Program on Lucknow
Chief Guest
Club Members Present 40
Minutes of Meeting गुरुवार, १७ नोव्हेंबरची आपल्या क्लबची मीटिंग बऱ्याच अर्थानी विशेष ठरली. प्रमुख वक्ते झंकार गडकरी हेस्वतः सिनियर रोटरीयन ! त्यांना रोटरी culture चा पुरेपूर अनुभव ! सगळ्यात आधी तर त्यांना आपल्या क्लबचा माहौलच फार पसंत पडला...आपली सगळी मंडळी उत्साहात आणि अगदी छान लखनवी पेहेरावात आली होती.रोटरी बिझिनेस नंतर कार्यक्रमाची सुरुवात राधिका आणि स्वरा या दोघींच्या अतिशय लालित्यपूर्ण कथक नृत्यानेझाली. त्यांनी कृष्णवंदना सादर केली.झंकारजींचा इतिहासाचा अभ्यास खूपच आणि सादरीकरण सुद्धा अतिशय प्रभावी. त्यांनी अवध कुठे, त्या भागाचं महत्त्व काय, इथपासून माहिती सांगायला सुरुवात केली. अवधचेनबाब, त्यांच्या संपत्तीच्या आणि दानशूरपणाच्या कहाण्या, त्यांनी बांधलेलेमहाल आणि काहींच्या कर्तृत्ववान बायका, हा सगळा इतिहास अतिशय रोचकपणे सांगितला. त्यांचं संपूर्ण सादरीकरण लखनऊचे अतिशय उत्कृष्ट फोटो, जुने दस्तावेज, यासहित नेमक्या माहितीने नटलेले होते. त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा सांगितला की जर तुमचं planning आणि leadership चांगली नसेल तर नुसतेचांगलेउद्देश आणि कष्ट तुम्हाला यश देणार नाहीत. अवधच्या इतिहासाचा, तिथल्या बंडाचा हा धडा आहे. कथक नृत्यांगनांची ओळख रो योगेश्री नेकरून दिली. झंकारजींचा परिचय ऍन वैजयंती नेकरून दिला. PP मकरंद नेआभार प्रदर्शन केले. इतक्या रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता तितक्याच रंगतदार अवधी जेवणानेझाली. त्याबद्दल फेलोशिप कमिटी आणि त्यांचेसगळे supporters यांचेही मनापासून कौतुक!!!