Diwali Pahat

Meeting Details

Meeting Date 09 Nov 2023
Meeting Time 06:00:00
Location New English School Ganesh hall
Meeting Type Regular
Meeting Topic Diwali Pahat
Meeting Agenda Diwali Pahat program
Chief Guest
Club Members Present 35
Minutes of Meeting रोटरी क्लब ऑफ पुणे मेट्रो ची यावेळची दिवाळी पहाट अतिशय अविस्मरणीय झाली. पहाटेची रम्य वेळ, त्यात न्यू इंग्लिश स्कूलचा सुरेख परिसर, जुन्या ऐतिहासिक प्रशस्त इमारतीच प्रांगण बघूनच मनाला प्रसन्न वाटत होतं. माधवी कुलकर्णी ,नेहा, एडमिन डायरेक्टर मोहन छत्रे, स्नेहलता माधवी रवी,मकरंद,दीपक नीलिमा हे सगळे पहाटेच आले. आकाश कंदील, झेंडूच्या फुलांच्या माळा, रांगोळ्या, पणत्या, दिवाळीचा किल्ला, विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची सुरेख आरास या सगळ्यामुळे दिवाळीची वातावरण निर्मिती झाली.ऑडिटोरियमची निवड सुयोग्य होती. भरतनाट्यमचा एक आगळावेगळा कार्यक्रम या वेळेच्या दिवाळी पहाटचे वैशिष्ट्य होता. भरतनाट्यम च्या वस्त्रालंकारांनी नटलेल्या तरुणींचे नुसते दर्शनही प्रसन्न होते . मेघा भोजकरने अमिताचा परिचय करून दिला.भरतनाट्यम गुरु अमिता गोडबोले आणि आपली वैदेही यांनी विविध तमिळ -कन्नड गाणी आणि मराठी अभंग निवडले. अप्रतिम पदन्यासातून ते सादर केले. डोळ्यांचे पारणे फिटणे म्हणजे काय हा अनुभव प्रत्येक मेंबरने घेतला. झाशीच्या राणीची वीरश्री,तुकोबाची भक्ती, तमिळ भाषेची महती, कन्नड लोकनृत्य, कृष्णा तिल्लाना चां कालियाचा थरार हे सर्व अमिता गोडबोले आणि तिच्या शिष्यावृंदांनी आपल्यापुढे एका मागोमाग उलगडला. वैदेही ने चपखल सूत्रसंचालन केले.आपली गार्गी पण शिष्यवृंदात सामील होती ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. यावेळेला फेलोशिप बहारदार होती . पूर्णिमा आपल्यासाठी यावर्षीची अन्नपूर्णा आहे. तिची पदार्थांची निवड आणि थीम साठीचे कष्ट याला तोड नाही. माधवी K च्या दिवाळीच्या दिव्यांना आणि कल्पकतेला दाद द्यायलाच हवी . राजा, अण्णा विवेक ,माधवी गांधी, मधुरा यांनी वेशभूषा छान भूषवली. प्रेसिडेन्ट सुरेखा सगळ्या टीम मागे खंबीर पणे उभी होती. सोनेपे सुहागा - मराठी माणसाच्या मनाला भावणारी भेट म्हणजे दिवाळी अंक. मराठी मंनासाठी आवडता फराळ. आणखी काय हवे.